आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट बेकरी हत्याकांड; चौघांची जन्मठेप कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातमधील 2002 च्या गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये बडोद्यातील बेस्ट बेकरीवर हल्ला करून 14 जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चौघांची जन्मठेप मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली. उर्वरित पाच जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. सोमवारी हायकोर्टाने हा निकाल देताना संजय ठक्कर, बहादूरसिंग चौहान, सानाभाई बारिया तसेच दिनेश राजभर यांची जन्मठेप कायम ठेवली आहे. हे आरोपी तलवारी आणि प्राणघातक शस्त्रांसह घटनास्थळी होते, अशी साक्ष हल्ल्यातून बचावलेल्या काही लोकांनी दिली होती. राजूभाई बारिया, पंकज गोसावी, जगदीश राजपूत, सुरेश बसवा आणि शैलेश तडवी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हत्याकांडात शेख कुटुंबीयांसह 14 जणांना जाळून मारण्यात आले होते. 17 आरोपींविरुद्ध मुंबईत खटला चालवण्यात आला. यातील 9 आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने जन्मठेप ठोठावली होती. याविरुद्ध हायकोर्टात अपील करण्यात आले होते. न्यायमूर्ती प्रमोद कोदे आणि न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली.