आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबीजेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा संप; बोनस जाहीर न झाल्याने नाराजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी 21 ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला आहे. रक्षाबंधनप्रमाणे भाऊबीजेलाही बेस्ट बसेस रस्त्यावर धावणार नाहीत. त्यामुळे सणासुदीला बहिण-भावांकडे जाताना मुंबईकरांचे हाल होण्याची चिन्हे आहेत.
 
बेस्टच्या बसेस 21 ऑक्टोबरला संपूर्णत: बंद राहणार आहेत. बेस्टचे 32 हजार कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यामुळे बेस्टच्या 3800 बसपैकी एकही बस रस्त्यावर धावणार नाही. 30 लाख प्रवाशांचे हाल होणार आहेत.बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर न झाल्यामुळे बेस्ट संयुक्त कृती समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. बोनस जाहीर न झाल्यास 18 तारखेपासून 21 पर्यंत ऐन दिवाळीतच बेस्ट संयुक्त कृती समितीचे नेते उपोषणाला बसणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...