आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट कर्मचाऱ्यांना पाच हजार 5,500 रुपये बोनस; बैठकीनंतर कर्मचाऱ्यांचा संप मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबई- मुबई पालिकेचा परिवहन विभाग म्हणजे बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नाही, अशी भूमिका पालिका आयुक्तांनी घेतली होती. यामुळे कर्मचारी संघटनांनी उपोषण सुरू करून भाऊबिजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा दिला होता. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने संपाचा इशारा दिला असतानाच महापौरांकडे झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपये बोनस देण्याचे महापौरांनी जाहीर केले आहे. यासाठी पालिका बेस्टला २५ कोटी रुपये देणार आहे. 
 
बेस्टची आर्थिक स्थिती बिकट आहे. कर्मचारी संघटना दिवाळीसाठी बोनस मिळावा यासाठी आग्रही आहे. आर्थिक स्थितीमुळे बेस्ट बोनस देण्याच्या स्थितीत नाही. कायदेशीर अडचणींमुळे महापालिकेलाही बेस्टला थेट मदत करण्यात अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका बोनसऐवजी तेवढीच रक्कम आगाऊ स्वरूपात कर्ज म्हणून सुधारणा करण्याच्या अटींवर बेस्टला देण्यास तयार आहे. बेस्ट ही रक्कम कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम म्हणून देईल. सदर सुधारणांची प्रक्रिया सुरू झाल्यास दिली जाणारी आगाऊ रक्कम बोनस म्हणून गणली जाईल. सुधारणांची प्रक्रिया सुरू न झाल्यास सध्या दिवाळीसाठी दिलेली रक्कम आगाऊ समजून प्रचलित नियमाप्रमाणे ती नंतर वसूल केली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.   

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने १८ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले होते. २१ ऑक्टोबरला भाऊबिजेच्या दिवशी संप करण्याचा इशारा संघटनांनी प्रशासनाला दिला होता. बोनस जाहीर केल्याने भाऊबिजेच्या दिवशी होणारा संप टळला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस मिळाल्याने  आनंद व्यक्त करून पालिका प्रशासनाचे आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...