आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईची लाईफलाइन होणार ठप्प; बेस्ट कर्मचाऱ्याचा 6 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेस्ट कर्मचारी वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी हा येत्या 6 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेतानाच हा संपाचा इशारा देण्यात आला आहे.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने गेल्या चार दिवसांपासून वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषण सुरु होते. काल दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. 6 ऑगस्टपर्यंत आपल्या वेतनविषयक मागण्या मान्य न झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला.
 
गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला जात नाही. त्यामुळे मे महिन्याच्या थकलेल्या पगारापैकी अर्धा पगार 19 जूनला बेस्ट कर्मचाऱ्यांना देण्यात आला. यानंतर उर्वरित पगारासाठी बेस्ट कर्मचारी संघटनांनी 22 जूनला संपाचे हत्यार उपसले होते.
बातम्या आणखी आहेत...