आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Best Install The GPS System In One Thousand And Five Hundred Buses

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेस्टच्या दीड हजार बसेसमध्ये जीपीएस प्रणाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बेस्टने शहरातील दीड हजार बसेसमध्ये जीपीएस प्रणाली बसवली आहे. यामुळे अधिका-यांना या बसेसवर निगराणी ठेवणे सोयीस्कर होणार असून ग्राहकांना अतिरिक्त सेवा देता येणार आहे.


कंडक्टर्सकडील ई- तिकिटिंग सिस्टिम जीपीएसमार्फत कंट्रोल रूमला जोडली जाणार आहे. विविध मार्गांवरील बसची ठरावीक कालावधीत किती तिकीट विक्री झाली हे समजणे सोपे होईल. त्यामुळे प्रत्येक तासाला तिकीट विक्रीची एकत्रित माहिती जमा करणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमुळे एखाद्या मार्गावर ठरावीक कालावधीत नफ्यात चालणारी बस शोधता येईल, त्याचप्रमाणे तोट्यातील मार्ग लक्षात येऊ शकेल, असे एका अधिका-याने सांगितले.


जीपीएस प्रणालीमुळे प्रवाशांना पुढच्या थांब्याची आगाऊ सूचना मिळू शकेल. बस थांब्याची घोषणा करण्यात येईल, तसेच त्यासंबंधीची माहिती बसमधील एलसीडी स्क्रीनवर दाखवली जाणार आहे. प्रवाशांना संबंधित मार्गावर दुसरी बस केंव्हा मिळेल याचा अंदाज कळू शकणार आहे. यासाठी प्रवाशाला बस स्टॉप कोडचा एसएमएस करावा लागणार आहे.