आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री भाग्यश्री 'सुकन्या'ची अॅम्बेसेडर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्र शासनाच्या 'बेटी बचाव बेटी पढाओ' या योजनेच्या धर्तीवर राज्यात भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा नुकताच शुभारंभ झाला. अभिनेत्री भाग्यश्री या योजनेची जनजागृती करणार असून राज्य सरकारने या 'सुकन्या भाग्यश्री'ची अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

या योजनेअंतर्गत एक मुलगी असेल आणि आईने या मुलीच्या जन्माच्या वेळीच अंतिम कुटुंब नियोजन केले असेल तर संबंधित मुलीच्या नावे पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच ही मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत तिला दर्जेदार पोषण आहारासाठी प्रतिवर्षी हजार रुपये देण्यात येतील. मुलीच्या प्राथमिक शिक्षणासाठी प्रतिवर्ष अडीच हजार प्रमाणे वर्षानंतर 10 हजार देण्यात येतील. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रतिवर्ष हजार याप्रमाणे वर्षानंतर 24 हजार रुपये देण्याची योजनेत तरतुद करण्यात आली आहे. याशिवाय एकुलती एक मुलगी असलेल्या आईने दुसऱ्या मुलानंतर अंतिम कुटुंब नियोजनची हमी दिल्यास अथवा दुसऱ्यादा मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यास प्रतिवर्ष अडीच हजार याप्रमाणे पाच वर्षांपर्यंत देण्यात येणार आहे. या मुलीच्या माध्यमिक उच्चशिक्षणासाठी प्रतिवर्षी हजार प्रमाणे 16 हजार रुपये देण्याची तरतूद आहे.
बातम्या आणखी आहेत...