आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Betting On Loksabha Election, Modi Rate Low, Kejriwal Rate On High

निवडणुकीवर हजारो कोटींचा सट्टा; वाचा, कोणत्या नेत्यांना किती मिळतोय \'भाव\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी देशभरातील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीत सुमारे 70 हजार कोटींचा सट्टा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही दिवसापासून निवडणुकांवर लागणा-या सट्ट्याचे भाव खुले झाले असून, काही दिवसात हजारों कोटींचा सट्टा लागल्याचे पुढे येत आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना 42 पैसे इतका सर्वाधिक कमी भाव फुटला असल्याची माहिती मिळत आहे. तर अरविंद केजरीवाल यांना 500 रूपये इतका भाव फोडण्यात आली. राहुल गांधींना 7 रूपये, मुलायम सिंह यांना 12, जयललितांना 16 तर ममता बनर्जींना 22 रूपये असा भाव फुटला आहे. यंदाच्या निवडणुकीत ऑनलाईन सट्टा होण्याची शक्यता असून, यातूनच सर्वाधिक उलाढाल होईल अशी माहिती सट्टेबाजारातील सूत्रांकडून मिळत आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तसेच ती सट्टेबाजांसाठीही राजधानीच आहे. येथे सर्व प्रकारचे सट्टेबाजे चालते. याची उलाढाल हजारो कोटींच्या घरात असतो. त्यामुळे सट्टा खेळणा-यांवरही पोलिसांच्या सायबर सेलची करडी नजर राहणार आहे.
पुढे वाचा, सीबीआय आणि आयबीची राहणार करडी नजर...