आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाभा अणुकेंद्राची ड्रोन कॅमेर्‍याने टेहळणी; अनोळखी व्‍यक्‍ती ताब्‍यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
मुंबई - सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असणा-या भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये (बीएआरसी) परिसराची ड्रोन कॅमे-याने टेहळणी होत असल्‍याचा प्रकार आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आला. या ड्रोनची उंची २० मीटरपर्यंत होती. तो जवळपास २५ मिनिटांपर्यंत आकाशात घिरट्या घालत होता. त्यानंतर हा ड्रोन त्या परिसरातून गायब झाला.
या प्रकरणी पोलिसांनी एका अनोखळी व्‍यक्‍तीला संशयित म्‍हणून ताब्‍यात घेतले आहे.
भाभा अणुकेंद्र पूर्वीपासूनच दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट'वर आहे. परिणामी, येथे कडक सुरक्षा व्‍यवस्‍था आहे. दरम्‍यान, मंगळवारी या परिसरात ड्रोण कॅमेरा आढळून आला. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे.
पुढील स्‍लाइडवर क्लिक करून वाचा यापूर्वीही कुख्‍यात दहशवाद्याने केली होती पाहणी