आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहाय सक्तीच्या रजेवर; जैन यांच्याकडे जबाबदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वरिष्ठ आयएएस अधिकारी भगवान सहाय यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्यावर कृषी विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याचे समजते.

कृषी विभागाचे उपसचिव राजेंद्र घाडगे यांनी नैराश्यग्रस्त मुलाने तातडीने घरी येण्यासाठी फोन केल्याचे सांगितल्यानंतरही सचिव सहाय यांनी त्यांना घरी सोडले नव्हते. वडील घरी न आल्याने घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. सहाय यांच्या आडमुठेपणामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत कारवाईची मागणी केली होती. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी चौकशी करून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भगवान सहाय यांच्या खात्याची जबाबदारी दिनेशकुमार जैन यांच्यावर सोपवली. पदभार नसल्याने भगवान सहाय रजेवर असून जोपर्यंत त्यांना दुसरी जबाबदारी दिली जात नाही तोपर्यंत ते रजेवर असतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...