आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhagwat Says, Hindutva Has Capacity To Incorporate Other Religions

हिंदुत्वामध्ये इतर धर्मांना \'हजम\' करण्याची शक्ती - सरसंघचालक भागवत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी कृष्णजन्माष्टमी सोहळ्याच्या एक दिवस आधी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भागवत म्हणाले, 'हिंदूत्वात दुसर्‍या पंथांना पचवण्याची ताकद आहे.' ते म्हणाले, मागील दोन हजार वर्षांमध्ये हिंदू धर्माची पचनक्रिया थोडी बिघडली होती, त्यामुळे शैथिल्य आले होते, त्याचे दुष्परिणाम आजही आम्ही भोगत आहोत. त्यांनी कटक येथील वक्तव्य पुन्हा एकदा जोरकसपणे मांडेल, ते म्हणाले, 'हिंदुस्थान एक हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदुत्व हीच त्याची ओळख आहे.'
भागवत मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंती निमीत्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. येथील षण्मुखानंद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विश्व हिंदू परिषदेची (व्हिएचपी) स्थापना 29-30 ऑगस्ट 1964 मध्ये झाली. भागवत म्हणाले, 'पुढील पाच वर्षांमध्ये व्हिएचपीचे लक्ष्य देशातील सर्व हिंदूंना एका समान पातळीवर आणण्याचे असेल. सर्व हिंदू एकाच ठिकाणी पाणी भरतील, एकाच ठिकाणी प्रार्थना करतील आणि मृत्यू नंतर त्यांच्यासाठी एकच स्मशानभूमी असली पाहिजे.'
काही दिवसांपूर्वीच ओडिशामधील कटक येथे सरसंघचालक भागवतांनी, सर्व भारतीयांची ओळख हिंदू म्हणून झाली पाहिजे. सध्या देशात राहाणारे सर्वजण याच महान संस्कृतीचे वंशज आहेत. जर इंग्लंडमधील लोकांना इंग्रज, अमेरिकेतील लोकांना अमेरिकन आणि जर्मनीतील लोकांना जर्मन म्हटले जाते तर मग, हिंदूस्थानात राहाणार्‍यांना हिंदू का म्हणत नाही? असे, म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, डाव्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता.

भागवतांनी रविवारी केलेल्या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा वादळ उठले आहे. काँग्रेसचे नेते मनिष तिवारी म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून देशात धर्माच्या नावावर विभाजनवादी शक्ती डोके वर काढत आहे. भाजपचे सरकार आल्यापासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरवातीला कलम 370चा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यानंतर भाजप आणि संघ व त्यांच्या संबंधीत संघटना असेच विविध धार्मिक मुद्दे उपस्थित करत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, दिग्विजयसिंहाची टीका