आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरलांजीतील भोतमांगे यांना अखेर मिळाली तीन एकर जमीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशाला सुन्न करणाºया भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी हत्याकांडाच्या घटनेतून बचावलेल्या भय्यालाल भोतमांगे यांच्या नावावर सरकारने तीन एकर जमीन केली आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते त्यांना शासनाने दिलेल्या जमिनीचा सातबारा देण्यात आला.

2006 रोजी खैरलांजीत मानवतेला काळिमा फासणारे भयंकर हत्याकांड घडले होते. यात भोतमांगे यांच्या पत्नीसह तीन मुलांची हत्या झाली होती. त्यानंतर या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. राज्य सरकारने पीडित भोतमांगे यांना तुमसर येथील शासकीय वसतिगृहात नोकरी आणि घरकुल दिले होते.

अत्याचाराचे बळी ठरणा-यांना सामाजिक न्याय विभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येते. त्यानुसार भोतमांगे यांना सरकारी जमीन देण्याचा निर्णय शासनाने 20 डिसेंबर 2010 रोजी घेतला होता, परंतु या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नव्हती. या प्रकरणी दलित मित्र उत्तमराव गायकवाड यांनी भोतमांगे यांच्यासह गृहमंत्री आर. आर. पाटील यांची विधिमंडळात भेट घेतली आणि जमिनीचा प्रश्न प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर सरकारच्या हालचाली सुरू झाल्या.