आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारा हत्याप्रकरण सीबीआयकडे देण्यास सरकार तयार : गृहमंत्री

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भंडारा जिल्ह्यातील तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची सरकारची तयारी आहे, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.


पीडिताच्या कुटुंबीयांनी पोस्ट कार्डाद्वारे सीबीआय चौकशीची मागणी केली तरी ती तत्काळ मान्य करण्यात येईल, असे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना सांगितले. या घटनेला महिना उलटून गेला तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही, याकडे तावडे यांनी लक्ष वेधले. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या अहवालात या तीनही मुलींचा मृत्यू बुडून झाला असून त्यांच्या अंगावर अत्याचाराच्या खुणा नसल्याचे पाटील म्हणाले. या प्रकरणी 500 जणांची चौकशी करण्यात आली आहे. आरोपीची माहिती देणा-यास एक लाखाचे इनामही पाटील यांनी जाहीर केले.