Home »Maharashtra »Mumbai» Bharulata Kamble- Solo Female To Drive From England To Mahad India

मराठी महिलेची ‘लंडन ते महाड’ कार सफर, भारुलता कांबळे करणार विश्वविक्रम

विशेष प्रतिनिधी | Apr 22, 2016, 02:33 AM IST

मुंबई -‘लंडन ते महाड’ या कार सफरीवर भारुलता कांबळे ही मराठी महिला १६ जुलै रोजी निघणार अाहे. ७५ दिवसांत ती युरोप आणि आशियातील तब्बल २८ देशांचा प्रवास करणार आहे. २८ सप्टेंबर रोजी महाड या तिच्या कोकणातील गावी जेव्हा तिचा प्रवास संपवेल तेव्हा तिच्या नावे एकट्या महिलेने मोटारीने दोन खंडांचा लाँग ड्राइव्ह प्रवास करण्याचा विश्वविक्रम नोंदला जाणार आहे.

भारुलता कांबळे इंग्लंडची नागरिक आहे. मात्र, ती जन्माने गुजराती असून तिचे पती कोकणातील महाडचे आहेत. ड्रायव्हिंगचा मोठा शौक असलेली ४२ वर्षीय भारुलता गेले अनेक दिवस एकटीने लाँग ड्राइव्ह प्रवासाचा िवश्वविक्रम करण्याची तयारी करत आहे. त्याबाबत भारुलताने गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपल्या सफरीची माहिती दिली.

पर्वत, वाळवंटातून मार्गक्रमण
लंडन ते भारत या ७५ दिवसांच्या प्रवासात ती २८ देशांत जाणार आहे. या सफरीत तिचा एकूण प्रवास ३१ हजार किमी असून त्यातील ५ हजार ५०० किमी पर्वतरांगेतून, तर २ हजार ५०० किमी प्रवास वाळवंटातील असणार आहे. या प्रवासासाठी तिने बीएमडब्ल्यू या कारची निवड केली अाहे. विशेष म्हणजे या प्रवासात ती एकटीच असेल.

या सफरीत ती ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देणार अाहे. महिलेस स्वातंत्र्य अाणि पाठिंबा दिला तर तिला काहीही अशक्य नाही हे मी जगाला सांगू इच्छिते आहे, असे मत भारुलताने 'दिव्य मराठी’ला सांगितले.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारुलता कांबळे यांचे फोटोज...

Next Article

Recommended