आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जितेंद्र आव्हाडांचे कार्याध्यक्षपद काढले, मावळते प्रदेशाध्यक्ष जाधव होणार जलसंपदा मंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्षपद भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला जितेंद्र आव्हाडांनी अनुमोदन दिले. वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीने मंत्रिमंडळ तसेच संघटनेत केलेल्या फेरबदलात जितेंद्र आव्हाडांसाठी खास कार्याध्यक्षपद तयार करण्यात आले होते. ते आता काढून घेण्यात आले आहे. आता या पदावर नवीन निवड करण्यात येणार नाही.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बुधवारी बैठक झाली. त्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व मंत्री, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. वर्षभरापूर्वीच्या फेरबदलात जाधवांकडील मंत्रिपद काढून घेत त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले होते. आता जाधव यांना तटकरे यांच्याकडील जलसंपदा मंत्रिपद देण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्षापदाच्या शर्यतीत तटकरेंबरोबर छगन भुजबळ, आर.आर.पाटील यांचीही नावे चर्चेत होती. मात्र भुजबळ व आर.आर. यांना मंत्रिपदही हवे होते. त्याला शरद पवारांनी नकार दिल्याचे समजते.

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांचे अयशस्वी झालेले ओबीसी कार्ड तसेच नाशिकमधील त्यांची घटक चाललेली लोकप्रियता याचाही विचार होऊन त्यांच्या नावावर काट मारण्यात आल्याचे समजते.