आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर जाधवांच्या मुला-मुलीच्या शाही विवाहसोहळ्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या मुलाच्या व मुलीच्या लग्नांत कोट्यावधी रुपये खर्च केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला विषय ठरला आहे. जाधवांच्या या कृतीमुळे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षानेही नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात सध्या मोठा दुष्काळ आहे. अशा स्थितीत मंत्री व नेत्यांच्या मुला-मुलींची विवाहसोहळे एकदम शाही कसे होत आहेत, असा सवाल सामान्य जनता करीत आहे. विशेष भास्कर जाधव ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही मंत्र्यांनी व नेत्यांनी विवाहसोहळ्यात कोट्यावधी रुपयांची उधळण करु नये, असे बजावले आहे. तरीही भास्कर जाधव यांनी तसा प्रयोग करुन पाहिल्याने राष्ट्रवादी पक्ष त्याची कशी दखल घेतो, महत्त्वाचे ठरणार आहे. शरद पवारांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर, भास्कर जाधव यांनी पुन्हा अशी चूक होणार नाही, असे सांगून याप्रकरणी माघार घेतल्याचे दिसून येते.

भास्कर जाधव यांच्या मुलाचा व मुलीचा बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे शाही विवाह संपन्न झाला. या सोहळ्याला राज्यातील तमाम नेते व मंत्री उपस्थित होते. या नेत्यांसाठी व्हीव्हीआयपी कक्ष बनविले गेले होते. मंडपस्थळाजवळ सुमारे 22 हेलिपॅड तळ बनविले होते. तसेच या सोहळ्यासाठी 5 लाख वर्गफुटाचा भव्य असा विवाह मंडप तयार करण्यात आला होता.


या विवाहसोहळ्यात सुमारे 40 हजारांपेक्षा जास्त पाहुण्यांनी हजेरी लावली. यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह 25 मंत्री, वरिष्ठ अधिकारी, विविध राजकीय पक्षातील नेते व वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते, बॉलिवूडमधील नामांकित हस्तिया यांचा वधू-वरांना शुभ आशीर्वाद दिले. तसेच या लग्नासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सोहळ्याला जाणे टाळले. भास्कर जाधव हे अजित पवारांचे जवळचे म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांनी दांडी का मारली याचे कारण कळाले नाही. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जेव्हा आम्ही संपर्क साधला तेव्हा अजित पवार स्वागत समारंभाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

असे असले तरी, या जाधवांनी केलेल्या शाही विवाहसमारंभामुळे राष्ट्रवादीत पक्षात विशेष नाराजी असल्याचे कळते. राज्यात मोठा दुष्काळ पडला असताना जनतेच्या प्रतिनिधींनी त्यांच्या दु:खात सहभागी न होता कोट्यावधी रुपयांचा चुराडा करणे तर्कसंगत नसल्याचे पक्षाला वाटते. या शाही सोहळ्यासाठी जेवढा खर्च केला तो खर्च दुष्काळी भागात देता आला असता व दुष्काळात होरपळणा-या जनतेला दिलासा देता आला असता, असे आता बोलले जावू लागले आहे.

चंद्रकांत खैरेंनीही गिरवला कित्ता- औरंगाबादमधील खासदार चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांच्या विवाह सोहळय़ाच्या निमित्ताने बुधवारी औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचे स्नेहमिलन पाहायला मिळाले. शिवसेना नेते संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, रामदास आठवले यांच्यासह विविध पक्षांचे नेते, उद्योजक, अधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ते यांनी या सोहळय़ाला हजेरी लावली. खासदार खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि प्रज्ञा यांचा विवाह सोहळा बुधवारी सायंकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर थाटात पार पडला. धार्मिक विधी पार पडल्यानंतर विविध संत-महंतांनी वधू-वरांना आशीर्वाद दिले.

एकनाथ खडसेंच्या मुलीचे साधेपणाने लग्न- राज्यातील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या मुलीचे लग्न गुरुवारी (14 फेब्रुवारी) पुण्यात साधेपणाने पार पाडले. गुरुवारी दुपारी पुण्यातील एका हॉटेलात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला. याबाबत सांगितले जात आहे की, राज्यातील जनता दुष्काळाने होरपळली जात असताना बडेजावात विवाह सोहळा करण्यास खडसेंची इच्छा नव्हती. त्यामुळे वधू-वर व आप्तेष्टांच्या चर्चेनंतर साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.