आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायलेकींची हत्येपूर्वी प्रियकराने बनवला डान्सचा व्हिडिओ, फ्लॅटमध्ये सापडले कुजलेले मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर छडा लागला आहे. महिलेच्या प्रियकरानेच मायलेकीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. विनायक कपूर असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दीपिका संघवी (29) आणि हेतल (8) असे मृतांची नावे आहेत. 

दीपिका संघवीसोबत विनायकचे प्रेमसंंबंध होते. ती त्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करायची. त्यामुळे दीपिकासह हेतलची हत्या केल्याचे विनायकने पोलिसांना सांगितले आहे. हत्या करण्यापूर्वी विनायकने मोबाईलमध्ये दीपिका आणि हेतलच्या डान्सचा व्हिडिओ बनवला होता. 

दीपिका करत होती विनायकला ब्लॅकमेल...   
- भाईंदर ईस्टमधील गोल्डन नेस्ट भागातील ही घटना 28 जानेवारीला उघडीस आली होती.  
- सोनम सरस्वती बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक 401 मध्ये सायंकाळी मायलेकींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडले होते.  
- दीपिका कार्तिक संघवी (29) गेल्या काही वर्षांपासून सोनम सरस्वती बिल्डिंगमध्ये राहात होती. नवऱ्यासोबत पटत नसल्याने तिने त्याला घटस्फोटीत दिला होता. 
- मुलगी हेतलसोबत ती एकटीच राहत होती. ती कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होती. 
- दीपिका आणि आरोपी विनायक हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यामुळे दोघांमध्ये प्रेम संबंध जुळले.
- विनायकचे नेहमी दीपिकाच्या घरी येणे-जाणे होते. दोघांमध्ये शारीरिक संबंधही होते.
- दीपिकाची नोकरी गेल्यामुळे ती विनायककडे सारखी पैशाची मागणी करायची. त्याला बॅकमेल करायची.
- पैशावरुन दोघांमध्ये 25 जानेवारीला कडाक्याचे भांडण झाले होते.
- त्याच रात्री विनायकने दीपिकाचा गळा चिरुन हत्या केली. मात्र, हेतल हिने दीपिकाची हत्या करताना विनायकला पाहिले होते. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हेतलचा गळा दाबून तिचीही हत्या केली. दोघांचे मृतदेह रजाईत गुंडाळून सोफा-कम-बेडमध्ये ठेवले.
- विनायक रात्रभर तिथेच थांबला. 26 जानेवारीला सकाळी साडे सात वाजता फ्लॅटला बाहेरुन लॉक लावून फरार झाला. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने 28 जानेवारीला फ्लॅटचे लॉक तोडल्यानंतर हत्याकांडाचा खुलासा झाला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, हत्येपूर्वी आरोपीने बनवला मायलेकींच्या डान्सचा व्हिडिओ... 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)