आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणकर्ते भय्या देशमुखांना आझाद मैदानावर मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - उजनीच्या पाण्यासाठी गेल्या 98 दिवसांपासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले सोलापूरचे शेतकरी प्रभाकर ऊर्फ भय्या देशमुख यांना शनिवारी रात्री एकाने मारहाण केली. सुशील विश्वासराव असे त्या व्यक्तीचे नाव असून तो चेंबूरचा रहिवासी आहे.

सोलापूर जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. शनिवारी मध्यरात्री सुशील हा उपोषणस्थळी आला. त्याने देशमुख यांना शिवीगाळ करत मारहाण केली; परंतु कार्यकर्त्यांनी त्याला रोखले.
आझाद मैदानावर बंदोबस्ताला असणार्‍या पोलिसांनी सुशील यास तत्काळ ताब्यात घेतले गुन्हा दाखल केला. सकाळी त्याची सुटका करण्यात आली. आझाद मैदानावरील उपोषणस्थळी बंदोबस्त द्यावा, अशी भय्या देशमुख यांनी मागणी केली आहे.

कार्तिकी वारीला अडवणार
कार्तिकी वारीला उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय पूजा असते. उजनी धरणात पाणी सोडण्यास विलंब केल्याबद्दल तसेच दुष्काळग्रस्तांची खिल्ली उडवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते विठ्ठलाची पूजा करण्यापासून रोखतील, असा इशारा भय्या देशमुख यांनी दिला आहे.