आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूरच्या भय्या देशमुखांचे अजित पवारांना आव्हान, महायुतीकडे पाच जागांची मागणी !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ज्यांच्या आंदोलनावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद सोडावे लागले, ते जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर उर्फ भय्या देशमुख विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एवढेच नव्हे तर बारामतीतून ते दस्तुरखुद्द अजित पवारांनाच आव्हान देणार आहेत.

सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी भय्या देशमुख यांनी १२१ दिवस आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यावर ‘धरणात पाणीच नाही तर xxx करायचे काय?’ असे लज्जास्पद वक्तव्य करून अजित पवार टीकेचे धनी झाले होते. याच कारणावरून त्यांनी काही काळासाठी का हाेईना उपमुख्यमंत्रिपदही सोडले होते. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर भय्या देशमुख हे नाव राज्यभर परिचित झाले होते.

गेला महिनाभर मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांच्या पाण्यासाठी देशमुख हे पुन्हा आझाद मैदानावार (मुंबईत) उपोषास बसले होते. िशव सेना-भाजपचे नेते त्यांना दररोज भेटण्यासाठी येत. त्यामुळे देशमुख यांचे आणखी प्रस्थ वाढत गेले. शेवटी आंदोलनाची दखल घेऊन चार िदवसांपूर्वी मंित्रमंडळाने देेशमुख यांच्या मागणीस मंजुरी देऊन टाकली.
दाेन्ही आंदोलनाला यश िमळाल्याने देशमुख सध्या भलत्याच फाॅर्मात आहेत. सोमवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन िवधानसभा िनवडणूक लढविण्याची घाेषणा केली. िवधानसभेसाठी महायुतीकडे पाच जागांची मागणी करतानाच, अापण स्वत: अिजत पवारांिवराेधात बारामतीतून लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. महायुतीने पाच जागा न िदल्यास सोलापूर िजल्ह्यात पाच मतदारसंघ स्वबळावर लढविणार असल्याचेही देशमुख यांनी ‘िदव्य मराठी’ला सांगितले.

जीवघेणा हल्ला
अिजत पवार यांना देशमुख यांच्या आंदोलनामुळे उपमुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे िचडून जाऊन राष्ट्रवादीच्या मुंबईतील एका कार्यकर्त्याने देशमुख यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला केला होता.

आझाद मैदान घर
उजनीच्या पाण्यासाठी १२१ िदवस आिण मंगळवेढा तालुक्यासाठी ४० िदवस अशी उपोषणे देशमुख यांनी आझाद मैदानावर केली. मंत्रालयावर घागर मोर्चा, गाढवाचे लग्न, गळफास आंदोलन, मंत्रालयासमोर लोटांगण, मुख्यमंत्र्यांच्या घरात िशरण्याचा प्रयत्न असे आंदोलनाचे िचत्रवििचत्र मार्ग चोखाळल्यामुळे देशमुख मुंबईत चर्चेत अाले अाहेत. आझाद मैदान हे त्यांच्यासाठी जणू दुसरे घरच बनले आहे.

राष्ट्रवादीचीच फूस
भय्या देशमुख मोहोळ तालुक्यातील (जि. सोलापूर) रहिवाशी आहेत. जनहित शेतकरी संघटनेचे ते अध्यक्षही आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहे. देशमुख यांना जिल्ह्यातीलच अजित पवार विरोधी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस असल्याची चर्चा आहे.