आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्त्यांसारखी कोसळली भेंडीबाजारातील ही इमारत, फोटो सांगत आहेत येथील भयावहता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरची हुसेनी ही 6 मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कोसळली. - Divya Marathi
दक्षिण मुंबईतील भेंडीबाजार येथील पाकमोडिया स्ट्रीटवरची हुसेनी ही 6 मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कोसळली.
मुंबई-  मुंबईतील भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरची हुसेनी ही 6 मजली इमारत गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता कोसळली. या घटनेत 34 जणांचा मृत्यू झाला असून 36 लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबईत 26 जुलैला घाटकोपरमध्ये 4 मजली इमारत कोसळल्याने 17 जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासन नोटीस बजावण्यापलिकडे काही करत नसल्याची भावना यामुळे नागरिकांमध्ये आहे. 
 
सकाळच्या वेळी ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताच परिसरात सर्वत्र धुळीचे लोळ उठले. त्या गोंधळात शेजारच्या इमारतीमधील काही रहिवाशांनीही जीव वाचवण्यासाठी अापल्या इमारतीतून उड्या मारल्या. 
 
ढिगाऱ्याखालून 51 जणांची सुटका
बहुसंख्य बोहरी समाज वास्तव्याला असलेला हा परिसर दाटीवाटीचा आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले असण्याची भीती वर्तवण्यात येत होती. NDRF ने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 51 जणांची सुटका करत त्यांचे प्राण वाचवले. मुंबई महापालिकेने 625 इमारतींना धोकादायक घोषित केले असून नोटीसही बजावल्या आहेत.
 
पुढील स्लाईडवर पाहा इमारत दुर्घटनेची भयावहता दर्शवणारी ही छायाचित्रे
बातम्या आणखी आहेत...