आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खैरलांजी घटनेतील पिडीत भोतमांगे यांना मिळणार 50 हजारांची मदत - आर.आर. पाटील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशभर गाजलेल्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी घटनेतील पिडीत भैय्यालाल भोतमांगे यांनी गुरुवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पाटील यांनी भोतमांगे यांना कोर्टाच्या खर्चाकरीता तत्काळ 50 हजाराची मदत जाहीर करुन पुढील कामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या खटल्यात सीबीआयला निष्णात वकील देण्यासंबधी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे पाटील म्हणाले.


खैरलांजी सत्यघटनेवर आधारीत ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटाच्या प्रिमियर खेळाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. त्यास उपस्थित राहण्यासाठी भैयालाल भोतमांगे मुंबईत आले होते.भोतमांगे यांच्याकडून पाटील यांनी खटल्यासंदर्भात सर्व माहिती घेतली. दोषींना केवळ जन्मठेप झाल्याबद्दल भोतमांगे यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली. तसेच सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याची माहिती त्यांनी आर. आर. यांना दिली.


सर्व दोषींना जन्मठेपेऐवजी फाशी व्हावी. त्यासाठी सीबीआयने निष्णात वकील देणे गरजेचे आहे. यासाठी आपण येत्या चार दिवसात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन आर. आर. यांनी भैय्यालाल भोतमांगे यांना दिले.