आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ आणि पीटर यांच्यात तुरुंगात जमली गट्टी, एकाच डब्यात जेवतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कारागृह सारख्या विचारांच्या लोकांना एकत्र आणतो असे म्हटले जाते. येथे कोणाची आणि कशी मैत्री होईल सांगता येत नाही. आता या श्रृंखलेत आणखी एक कडी जोडली गेली आहे. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ आणि शिना बोरा प्रकरणातील संशयीत, मीडिया टायकून पीटर मुखर्जी यांच्‍यात ऑर्थर रोड तुरुंगात चांगलीच गट्टी जमली आहे. महाराष्‍ट्र सदन व आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक असलेले राष्‍ट्रवादीचे नेते भुजबळ सध्‍या याच तुरुंगात आहेत. शीना बोरा हत्‍या प्रकरणातील आरोपी पीटर यांनाही याच तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पीटरच्‍या डब्‍यात दोघेही जेवतात..
- पीटर यांच्या घरुन दररोज जेवणाचा डबा येतो. मुखर्जी आणि भुजबळ हा डबा एकत्र खातात.
- डबा खाताना दोघांचा गप्पांचा फडही जमतो असेही वृत्त आहे.
- दोघांना एकत्र फेरफटका मारतानाही येथील कर्मचाऱ्यांनी बघितले आहे.
- भुजबळ आणि पीटर हे दोघेही सध्या या तुरुंगातील हायप्रोफाईल कैदी आहेत.
- भुजबळांनी न्‍यायालयाकडे घरच्‍या जेवणाची परवानगी मागितली होती. मात्र
न्‍यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
- पीटर डबा शेअर करत असल्याने भुजबळांची घरच्या जेवणाची समस्या सुटली आहे.
- नोव्‍हेंबरमध्‍ये तुरुंगात रवानगी झालेल्‍या पीटर यांना मात्र ही परवानगी मिळाली आहे.
- ऑर्थर तुरुंगातील या सेलमध्‍ये राष्‍ट्रवादीचा रमेश कदम हा नेताही आहे.
- कदमवर 132 कोटी रुपये हडपण्‍याचा आरोप आहे.
अशा असतात जेवणाच्‍या वेळा..
- सकाळी 11 आणि दुपारी 5 या तुरुंगातील जेवणाच्‍या वेळा आहेत.
- घरचे जेवण घेणा-या कैद्यांच्‍या वेळा वेगळ्या असतात.
- घरचा डबा देण्‍याची वेळ सकाळी 10 ते 4 पर्यंतची आहे.
- सायंकाळी 6 नंतर येथे जेवणाची परवानगी नसते.
पुढे वाचा, भुजबळांनी बेड आणि मनगटाच्‍या पट्ट्याची मागणी केली होती...
मंत्री असताना भुजबळांनी दिले होते, ऑर्थर रोड तुरुंगात स्‍पेशल सेल उभारण्‍याचे आदेश...