आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुजबळांना 'बॉम्बे'त उपचाराची मुभा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मनी लाँडरिंग प्रकरणात आर्थर रोड तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये २९ नोव्हेंबरपर्यंत उपचार करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने ईडीला बुधवारी दिले. याप्रकरणी न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्यासमोर सुनावणी झाली. गेल्या महिन्यात छगन भुजबळ यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारही बॉम्बे हॉस्पिटलमध्ये व्हावेत यासाठी भुजबळांच्या वतीने न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना दिलासा देत २९ नोव्हेंबरपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास मुभा दिली.
बातम्या आणखी आहेत...