आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhujbal Invested Money In His PA SAR Scheme Somayya

पीएच्या एसआरए योजनेत भुजबळांचा पैसा; सोमय्या यांचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक शैलेश चांगले यांनी मुंबईत 500 कोटी रुपयांची एसआरए योजना सुरू केली असून यात भुजबळ यांचा काळा पैसा गुंतल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला असून याबाबत राज्यपालांकडे पत्र पाठवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


सोमय्या म्हणाले, चांगले यांच्या बेनामी संपत्तीबाबत मी अगोदरच त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांचे रिसॉर्ट, मुंबईत अनेक फ्लॅटस, नाशकात बंगला आणि फ्लॅट आहे. त्यांची पाच लाख चौरस फुटांची एसआरए योजना भांडुप येथे सुरू आहे. ही योजना 500 कोटी रुपयांची असून यात चांगलेची पत्नी अनघा आणि वडील माधव भागीदार आहेत. चांगलेकडे 500 कोटी रुपयांच्या या योजनेसाठी पैसा आला कुठून असा सवाल सोमय्या यांनी केला.