आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांच्या रुग्णालयातील वास्तव्याचा गुंता वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : न्यायालयाच्या निकालानुसार छगन भुजबळ यांच्या दोन चाचण्या केल्यावर आम्ही त्यांचा ताबा आर्थर रोड कारागृह प्रशासनाकडे दिला होता.
त्यामुळे भुजबळांना खासगी बाँम्बे हाँस्पिटलमध्ये का व कुणाच्या आदेशाने दाखल केले याबाबत माहिती नसल्याचा खुलासा जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी केला.
त्यामुळे भुजबळांच्या खासगी रुग्णालयातील ३५ दिवसांच्या वास्तव्याचा गुंता अधिकच वाढला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हरकत घेत विशेष पीएमएलए न्यायालयात एक अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने जेजे रुग्णालयाचा खुलासा मागवला होता.
बातम्या आणखी आहेत...