आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूविकास बँकेचा आराखडा सादर करा ; सहकारमंत्र्यांचे आदेश

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भूविकास बँकेचे पुनरुज्जीवन, अवसायन अथवा विलिनीकरण या संदर्भात निर्णय घेण्यासाठी आठ दिवसांत आराखडा सादर करण्यात यावा, असे निर्देश सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी विधानभवनातील बैठकीत दिले.

बॅँकेचा तोटा, शासनास माफ करावे लागणारे कर्ज, नाबार्डला परत करावयाची रक्कम, नाबार्डची थकहमी, येणे कर्ज, कर्मचार्‍यांंचे मासिक वेतन, बँकेची मालमत्ता, सरासरी मासिक वसुली, स्वेच्छा निवृत्तीसाठी लागणारी रक्कम याबाबतची माहिती द्यावी, त्यानंतर बँकेचे विलीनीकरण अथवा अवसायानाबाबत निर्णय घेता येईल, असे पाटील म्हणाले.