आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्यात तरुणांनी झोकून द्यावे, ग्लोबल सिटिझन मोहिमेत मुख्यमंत्र्यांचे अावाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘देशाची ६० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही २५ वर्षाखालील युवकांची आहे. युवकांमध्ये प्रचंड क्षमता असते त्यांनी जर स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले तर समाजात खूप मोठे काम होऊ शकते. तरुणांमध्ये प्रचंड शक्ती आहे, त्यांना फक्त प्रेरणेची आवश्कता असते. ग्लोबल सिटिझन ही संकल्पना खूप चांगली असून याचा भारतीय तरुणांना खूप फायदा होईल,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी व्यक्त केले. ग्लोबल सिटिझन इंडिया माेहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बाेलत हाेते.
या माेहिमेत चांगल्या दर्जाचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि स्वच्छ पाणी व स्वच्छता हे तीन मुद्दे हाती घेतलेले आहेत. देशातील तरुण पिढी यासाठी चांगले काम करू शकेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जगभरातील नागरिक एकच म्हणजेच वैश्विक नागरिक असून त्यांना चांगले शिक्षण, पिण्यास स्वच्छ पाणी, शाैचालये उपलब्ध करुन देणे तसेच स्त्री-पुरुष समानता असावी यासाठी ‘ग्लोबल सिटिझन’ या नावाने ऑस्ट्रेलियाच्या ह्यूज इवान्सने एक संस्था स्थापन केली. या संस्थेशी जगभरातील आठ लाख व्यक्ती जोडल्या गेल्या असून याची भारतीय शाखा सुरु करण्यात येत आहे. शिव खेमका यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईत ग्लोबल सिटिझन इंडियाची घोषणा करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार पूनम महाजन यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमात फडणवीस, पूनम महाजन, अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान, फरहान अख्तर, करिना कपूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या संस्थेच्या कामाची माहिती देण्यासाठी १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत मनोरंजनात्मक कार्यक्रम हाेणार अाहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, काय म्हणतात सेलिब्रिटी
बातम्या आणखी आहेत...