आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B At Vidhan Bhavan Amitabh Name In Panama Papers

का करत आहे काँग्रेस ‘अमिताभ हटाव’ मागणी, बिग बींनी घेतली CM ची भेट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकेकाळी काॅंग्रेसचे खासदार असलेले प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांची राज्य सरकारच्या व्याघ्र प्रकल्प सदिच्छा दूत पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केली. परदेशात काळा पैसा दडवून ठेवलेल्या पनामा पेपर्समध्ये अमिताभ यांचे नाव असल्याचे कारण त्यासाठी देण्यात अाले.

या विषयावर सभागृहात विरोधकांचा गोंधळ सुरू असताना सत्ताधारी सदस्यांनीही प्रत्त्युत्तर दिल्याने गाेंधळ वाढला. एखादी व्यक्ती दोषी असेल तर तिच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही, पण ज्या व्यक्तीचे लाखो चाहते आहेत, अशा नामांकित व्यक्तीचे नाव सभागृहात घेऊन नये, असा मुद्दा योगेश सागर यांनी मांडला. तर वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांच्या आधारे अशा प्रकारे सभागृहात मुद्दा उपस्थित केला जात नाही, असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
दरम्यान, बच्चन यांच्या विरोधात विधानसभेत गोंधळ सुरू असतानाच वित्तीय सेवा केंद्राच्या निमित्ताने ते मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्रालयात गेले होते. तेथील बैठक आटपून बच्चन देवेंद्र फडणवीसांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. तेथे देवेंद्र फडणवीस व त्यांच्याच खास चर्चाही झाली. वांद्रे कुर्ला संकुलात ६० एकराच्या जागेवर िवत्तीय सेवा मंडळाचे केंद्र उभे राहणार आहे. याविषयीच्या बैठकीला अमिताभ यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत िसन्हा, नॅसडॅकचे माजी अध्यक्ष मॅक्स बाकर, आयसीआयसीआयच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर व खासदार पूनम महाजन उपस्थित होत्या. या केंद्रात कला िवभाग सुरू केला जाणार असून या िवभागासंबंधी अमिताभ बच्चन सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. या वेळी बच्चन यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते. पनामा प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम.बी.शहा आणि केंद्रीय स्तरावरील समिती करत आहे. या बैठकीचा आणि चौकशीचा काही संबंध आहे का, याविषयी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अमिताभ बच्चन व त्यांच्या वकिलांना प्रश्न िवचारले. पण, दोघांनीही याविषयी काहीही बाेलण्यास नकार दिला.