आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांनी हरिवंशराय बच्चन यांना वाहिली श्रद्धांजली!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्‍विटरवर 'मिटटी का तन, मस्ती का मन क्षण भर जीवन मेरा परिचय...' असे ट्‍विट करून आपले वडील आणि कवी हरिवंशराय बच्चन यांच्या नवव्या पुण्यातिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.
'माझ्या आयुष्यातील साठ वर्षे मी वडिलांच्या छत्रछायेत घालविली. आज मी त्यांच्या खोली बाहेर उभा आहे. या खोलीत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 18 जानेवारी हाच तो दिवस. मी त्यांची खोलीच्या दरवाज्यावर उभा राहून त्यांची वाट पाहतो आहे. परंतु ते येणार नाहीत. याचीही जाणीव मला आहे. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी न‍िर्माण झाली आहे.' असे म्हणत बिग बी यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.
स्व. हरिवंशराय बच्चन हे 'मधुशाला' आणि 'अग्निपथ' या रचनांमुळे जनमानसात ओळखले जात. वर्ष 2003 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 'प्रतीक्षा' या बंगल्यात त्यांचे निधन झाले होते.

बिग बींच्या आई-वडिलांनी केले होते सोनिया गांधीचे कन्यादान!