आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big B To Create Website Dedicated To Harivansh Rai Bachchan

वडिलांच्या साइटवर "बिग बी'च्या आवाजात कविता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अमिताभ बच्चन आपले दिवंगत वडील व प्रख्यात साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांच्यावर वेबसाइट तयार करत आहेत. इंटरनेटवर हरिवंशराय यांच्याशी संबंधित माहितीत तथ्यात्मक चुका असल्यामुळे अमिताभने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, हे संकेतस्थळ सामान्य संकेतस्थळांपेक्षा वेगळे असेल. यात हरिवंशराय यांचा जीवनपरिचय, छायाचित्रे व त्यांच्या साहित्यकृतींवरील मजकूर असेल. यापूर्वीही अमिताभ यांनी हरिवंशराय यांच्या निवडक कविता आपल्या आवाजात रेकॉर्ड करून त्याची सीडी प्रसिद्ध केली आहे. या वेबसाइटवर अमिताभ यांच्या आवाजात कविता, लहान-मोठ्यांसाठी कथा आदी मजकूर असेल. यात व्हिडिओ फुटेजही असेल.

याबाबतीत अमिताभ यांनी सांगितले की, सध्या उपलब्ध माहितीत बऱ्याच चुका आहेत. बाबूजींच्या चाहत्यांत विश्वसनीयता कायम राहावी, अशी आमची इच्छा आहे. यासाठी स्वत: वेबसाइट तयार करत आहे. आपल्या आवाजातील मजकुराच्या वृत्ताला दुजोरा देताना ते म्हणाले, वेबसाइटवर आॅडिओ बुक्स असतील. मुले, मोठ्यांसाठी विविध कथांचा एक विभाग असेल.

बाबूजींच्या कविता, कथा व किस्से ध्वनिमुद्रित आवृत्तीत असतील. शिवाय त्यांच्या रचनांनाही अमिताभ यांचा स्वर असेल. हे संकेतस्थळ ते सतत अपडेट करत राहतील. यात हरिवंशराय यांनी लिहिलेल्या कविता, कथा आणि किश्शांचे ऑडिओ व्हर्जनसुद्धा उपलब्ध असेल. अमिताभ पुढे म्हणाले, माझा ब्लॉग, ट्विटर व फेसबुक अकाउंटची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सीए मीडिया कंपनीवर बाबूजींच्या वेबसाइटची जबाबदारी देण्यात आली आहे.