आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटबंदीमुळे राज्यात मंदी! शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत राज्यभर टोलमाफीची घाेषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारच्या ५०० व १००० रूपयांच्या नोटांच्या बंदीच्या निर्णयामुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्व व्यवहार थंडावले. बिल्डर आणि विकासकांनाही याचा मोठा फटका बसणार असून या निर्णयामुळे सोने व्यापाऱ्यांची मात्र चांदी झाल्याचे चित्र निर्माण झाले. व्यापारी असो की गरीब वर्ग या साऱ्यांचीच बुधवारी परवड झाली.

दरम्यान, वाहतूकदारांना अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व राज्यमार्गांवरील टोल टॅक्स (पथकर) ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात मुंबईत येणारे एंट्री पॉइंट‌्स आणि मुंबई शहरातील टोलनाक्यांचा सुद्धा समावेश आहे. मुंबई मेट्रोलाही पाचशे, हजारच्या नाेटा स्वीकारण्याचे निर्देश देण्यात अाले अाहेत. तसेच खासगी रुग्णालयांनीही जुन्या नाेटा स्वीकाराव्यात, रुग्णांची अडवणूक करू नये, असे निर्देश अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत यांनी दिले अाहेत.

रिअल इस्टेट क्षेत्रात छोट्या-मोठ्या शहरांपासून अगदी महानगरांपर्यंत घरांची खरेदी विक्री करताना काही प्रमाणात रक्कम काळ्या पैशाच्या स्वरूपात स्वीकारण्याची पद्धत आहे. अनेकदा हे खरेदीदाराच्या व विक्रेत्याच्याही सोयीचे असते. तसेच नोकरशहा आणि राजकीय नेत्यांनी जमविलेली काळी संपत्तीही या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतविली जाते. केंद्राच्या या ताज्या निर्णयाने रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. कारण या व्यवसायातील उद्योगपती जमीन विकत घेण्यासाठी, अधिकारी-राज्यकर्ते यांना लाच म्हणून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख बाळगून असतात. ही रोख रक्कम साधारणत: ५०० वा १००० रूपयांच्या नोटेच्या स्वरूपात असते. त्यामुळे या व्यावसायिकांची मोठी पंचाईत झाली आहे. याशिवाय गेल्या एक दोन दिवसात घर खरेदी वा जमीन खरेदीचे व्यवहार करणाऱ्या सामान्यांचे मोठे हाल झाले आहे. कारण अनेकांना रोख रक्कम बिल्डरांना द्यावी लागली होती आणि आता ती बिल्डर त्यांना परत करून नव्या ५०० वा २००० च्या नोटांच्या स्वरूपात बदलून देण्याची मागणी करू लागले आहेत. असेच हाल व्यापाऱ्यांचेही झाले आहे. कारण हे व्यापारी रोज मोठी रोकड बाळगून असतात. त्यांचे सारे व्यवहार रोखीनेच होत असतात. ही रोख बँकेत जमा करून त्याची खात्यावर नोंद झाली की आपल्यावर प्राप्तीकर खात्याची नजर पडेल, अशी भीतीही ते बाळगून आहेत. अर्थात सर्वच व्यापारी वा व्यावसायिकांच्या संघटना अधिकृतपणे या निर्णयाचेच स्वागत करीत आहेत. मात्र खासगी चर्चेत आपली कशी अडचण झाली तेही सांगत आहेत.

पुढील स्लाईडवर वाचा, मोठ्या नोटा बंदीचा निर्णय कोणासाठी चांगला आणि कोणासाठी वाईट, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जनतेला आवाहन..
बातम्या आणखी आहेत...