आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवात मुंबईसह राज्यात चोख बंदोबस्त, 5 हजार सीसीटीव्‍ही कॅमेरे; पोलिसांच्या सुट्या रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आज  (शुक्रवार) गणेश चतुर्थी. 'गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया!' असा जयघोष...ढोल-ताशांचा आसमंतात घुमणारा आवाज...गुलालाची उधळण...अशा उत्साहपूर्ण भक्तिमय वातावरणात घरोघरी गणयाचे बाप्पाचे आगमन झाले. मुंबई, पुण्यासह राज्यभरात आगमन सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. गणेशोत्सवात कायदा सुव्‍यवस्‍थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांकडून चोख बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.

राज्यभरात 44 हजार पोलिस तैनात करण्‍यात अाले असून 5 हजार सीसीटीव्‍ही कॅमेर्‍यातून प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बंदोबस्‍त असल्याने पोलीस कर्मचार्‍यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या असून सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

मुंबईच्या लालबागच्या राजासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष सुरक्षा देण्यात आली आहे. बाराशेहून अधिक पोलिसांचा ताफा लालबागच्या राजासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.

44 हजार पोलिस, 5 हजार सीसीटीव्‍ही कॅमेरे
सुरक्षा व्‍यवस्‍था चोख रहावी, गर्दीचा फायदा घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून 44 हजार पोलिसांचा फौजफाटा व 5 हजार सीसीटीव्‍ही कॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहेत.  गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. मुंबई, पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरात ड्रोनचा वापर करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहेत.
बातम्या आणखी आहेत...