आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदाऊट मेकअप अशी दिसते हरियाणाची रागिनी सपना चौधरी, पाहा Unseen Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हरियाणाची रागिनी गायिका-डान्सर सपना चौधरी 'बिग बॉस-11' मधून बाहेर पडली आहे.  सपनाने रियालिटी शोसह तिच्या पर्सनल लाइफबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. इतकेच नाही तर सप्टेंबर 2016 मध्ये तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, त्यामागचे कारण काय होते, हेही सपनाने यावेळी स्पष्ट सांगितले.

 

सपनासोबतची खास बातचीत...

- 26 वर्षांच्या सपना चौधरीने वयाच्या 12व्या वर्षी वडिलांच्या निधनानंतर डान्स परफॉर्मन्स करुन घर चालवले होते.

- दरम्यान, सपनाने तिच्या एका कार्यक्रमात दलित समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होता. यामुळे तिच्यावर विरोधात गुन्हाही दाखल झाला होता. नंतर डिप्रेशनमध्ये गेल्याचे सपनाने सांगितले. या डिप्रेशनमध्येच सप्टेंबर 2016 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
- सपना म्हणाली, 'मला आणि माझ्या आईला या आरोपांचा फार त्रास झाला होता. हा त्रास असह्य झाला होता. माझ्यावर असा आरोप करण्यात आला होता, जे मी केलेच नाही. यामुळे माझ्या आईला खूप त्रास झाला होता. यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले. त्याकाळात कोणाचाच सपोर्ट मिळाला नाही.'
- 'तेव्हा असे वाटले की आता आयुष्यात काहीच राहिले नाही. आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नव्हता. मात्र नंतर कळाले की आपण फार मोठी चूक केली होती.'
- 'या घटनेला आता एक वर्ष उलटले आहे. मात्र आजही त्या घटनांची आठवण झाली अंगावर काटा उभा राहातो. मला डिप्रेशनमधून बाहेर येण्यास आईने फार मदत केली. मी कायम तिची ऋणी राहील.'

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... विदाऊट मेकअप अशी दिसते हरियाणाची रागिनी सपना चौधरी

बातम्या आणखी आहेत...