आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bigg Boss 7, Case Registered Against Ajaz Khan After BJP Protest In Lonavla

मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने बिग बॉस स्पर्धक इजाज खानविरूद्ध तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बिग बॉसमधील स्पर्धक इजाज खानविरूद्ध भाजपच्या कार्यकर्त्यांनी समतानगर पोलिस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे इजाजने केलेले विधान त्याला व बिग बॉस शोचे आयोजन करणा-या कलर्स वाहिनीला महागात पडण्याची शक्यता आहे.
कलर्स वाहिनीवर सध्या सुरु असलेला बिग बॉस शो अंतिम टप्प्यात आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून सतत वादात व चर्चेत राहिला आहे. यापूर्वी कुशाल टंडनने केलेली मारहाण, याचबरोबर अरमान कोहली व सोफिया हयात यांच्यातील हाणामारीचा वाद पोलिस ठाण्यात गेल्यानंतर अरमानला तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता इजाज खान याच्याविरूद्ध समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
पुढे वाचा, सलमान खान यालाही माफी मागावी लागणार...