आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बालिका वधु\'च्या वाढदिवसाहून परतताना सारा खानची कार उलटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -छोट्या पडद्यावरील कलाकार सारा खान आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यासह त्यांचे काही मित्र कार अपघातामध्ये जखमी झाले आहेत. 'बालिका वधू' मालिकेतील प्रत्यूषा बॅनर्जीच्या वाढदिवसाची पार्टी आटोपून मध्यरात्री तीनच्या सुमारास घरी परतत असताना त्यांची कार डिव्हायडरवर आदळल्याने अपघात झाला.

सिद्धार्थचा मित्र कार चालवित होता. ओशिवरा येथील मेगा मॉल समोरून जाताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि उलटली. सुदैवाने . या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

कारमध्ये सारासह पाच जण होते. या घटनेनंतर पोलिसांनी सगळ्यांची चौकशी केली. गाडीतील सगळे मद्यधूंद अवस्थेत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा प्रत्युषाच्या बर्थ डे पार्टीत क्लिक झालेली साराची छायाचित्रे...