आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: आशियातील सर्वांत मोठा कत्तलखाना मुंबईत, दररोज कापली जातात हजारो जनावरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मिरा-भाईंदर, मुंबई आणि नवी मुंबई महापालिकेत पर्युषण पर्वात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आधी दहा दिवस बंदी घालण्यात आली होती. आता त्यात बदल करण्यात आला असून दोनच दिवस बंदी असल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने गोवंश मांसवर बंदी घातली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतात सर्वांत जास्त गोवंश मांस विक्री मुंबईत होते. आशियातील सर्वांत मोठा कत्तलखाना देवनारला आहे. आज आम्ही तु्म्हाला या कत्तलखान्याची माहिती देणार आहोत.
दररोज कापली जातात 6 हजार जनावरे
देवनारमधून बीफ, मटण आणि गोश्त विदेशात पाठविले जाते. येथील अनेक फर्मना आंतरराष्ट्रीय मांस बाजारपेठेत मान्यता आहे. अशा प्रकारची परवानगी असलेला हा एकमेव भारतीय कत्तलखाना आहे. येथून युएई, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, पाकिस्तान आदी देशांना मांस पुरवठा केला जातो. दररोज सुमारे 10 ते 15 कोटी रुपयांचे मांस विकले जाते. 1971 मध्ये मुंबई महानगरपालिकेने याची स्थापना केली होती. येथे दररोज 6 हजार जनावरे कापली जातात.
बकरी ईदला लाखोंचा लिलाव
देवनारमध्ये मीट, बीफ आणि पोर्क यांच्यासह अनेक प्रकारच्या मांसाचा व्यवसाय होतो. बकरी ईदला हजारो बकरे येथे कापले जातात. त्यांची लाखो रुपयांची बोली लावली जाते. येथून भारताच्या अनेक राज्यांमध्येही मांस पुरविले जाते. काही चित्रपट कलाकारही येथून मांस विकत घेतात.
बीफ बॅननंतर कत्तलखान्यांमध्ये शुकशुकाट
महाराष्ट्र सरकारने बीफवर बॅन लावल्याने आता येथील कत्तलखान्यांमध्ये शुकशुकाट दिसून येतो. ज्या शेड्समध्ये बीफ मिळत होते तेथे आता व्यापारी दिसत नाहीत. बीफ बॅनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याचेही सांगितले जाते.
पुढील स्लाईडवर बघा, देवनार कत्तलखान्याचे फोटो... अंगावर उभा राहिल काटा....