आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकिनी पुतळ्यांवर बंदी येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मॉल, आऊटलेट व कापड दुकानांत असेल्या बिकिनी किंवा उत्तेजना निर्माण करणार्‍या पुतळ्यांवर बंदी घालण्याचा राज्य शासन विचार करत आहे. याबाबत कामगार मंत्रालयाने बॉम्बे शॉप अँक्ट 1948 मध्ये सुधारणा करून अशा अश्लील पुतळ्यांवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. कामगार मंत्रालयाचे सचिव अरविंद कुमार यांनीही त्याला दुजोरा दिला.
घाटकोपर येथील भाजप नगरसेविका रितू तावडे यांनी गेल्या वर्षी अशा पुतळ्यांविराधोत आंदोलन केले होते. मोठमोठय़ा दुकानांत व मॉलमध्ये बिकिनी व ‘ब्रा’मधील अर्धनग्न पुतळे असतात. त्यामुळे महिलांना अशा दुकानांत खरेदी करताना अडचण वाटते. लहान मुलांवरही वाईट परिणाम होतो. अनेक पुरुषांमध्ये यातून वासना निर्माण होत, असे आक्षेप त्यांनी नोंदवले होते.
अरविंद कुमार म्हणाले, या प्रस्तावित कायद्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व कापड दुकानांत आता असे पुतळे बसवण्यावर बंदी येईल. तसेच मॉडेलकिंवा अभिनेत्रींनी परिधान केलेल्या अंतर्वस्त्राचे पोस्टरही कुठे चिकटवता येणार नाहीत. याबाबत सर्वच महापालिकांना माहिती देण्यात येणार आहे.
गुन्हेगारीला आळा बसेल
कामगार मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला आहे. दुकानांत बसवण्यात येणार्‍या अशा पुतळ्यांमुळे समाजात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत आहे. या निर्णयामुळे काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नगरसेविका रितू तावडे यांनी सांगितले.