आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिलकिस बानो बलात्कार-हत्या प्रकरणी मुंबई HC कडून 12 दोषींच्या जन्मठेपेची शिक्षा कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलकिस बानो हत्या-बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने 12 दोषींचे अपील फेटाळले आहे. (फाइल फोटो) - Divya Marathi
बिलकिस बानो हत्या-बलात्कार प्रकरणी मुंबई हायकोर्टाने 12 दोषींचे अपील फेटाळले आहे. (फाइल फोटो)
मुंबई - गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो या महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात ११ दोषींचे अपील गुरुवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळले. सत्र न्यायालयाने त्यांना ठोठवलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. यासोबत पुराव्यांत फेरफार केल्याचा आरोप असलेले ५ पोलिस व  २  डॉक्टरांना निर्दोष ठरवणारा सत्र न्यायालयाचा निकाल फिरवण्यात आला.  आतापर्यंत भोगलेला तुरुंगवासही शिक्षेत धरला आहे. मात्र, यामध्ये प्रत्येकाला २०-२० हजार रु. दंड द्यावा लागेल. असे असले तरी तीन दोषींना  मृत्युदंड  देण्याची सीबीआयची मागणी हायकोर्टाने फेटाळली. या निकालानंतर दोषींची संख्या १८ झाली आहे.
 
विशेष न्यायालयाने २००८ मध्ये ११ जणांना जन्मठेप सुनावली होती. पुराव्यात फेरफार केल्याचा आरोप असलेल्या ७ जणांना निर्दोष ठरवले होते. दोषींच्या अपिलावर सुनावणी करून मुंबई उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी निकाल राखून ठेवला होता.
 
बिलकिसच्या कुटुंबावर केला होता 17 जणांनी हल्ला 
- 3 मार्च 2002 रोजी झालेल्या गोध्रा दंगलीनंतर अहमदाबादामधील रंधिकपूर येथे 17 जणांनी बिलकिस बानो यांच्या कुटुंबावर हल्ला केला होता. यात 8 जणांची हत्या करण्यात आली होती. 
- त्यावेळी 19 वर्षांच्या बिलकिस बानो 5 महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांच्यावर गँगरेप करण्यात आला होता. 
- या हत्याकांडात बिलकिस यांच्यासह त्यांची 3 वर्षांची मुलगी आणि दोन दिवसांच्या मुलाचीही हत्या करण्यात आली होती. 
- 21 जानेवारी 2008 ला मुंबई हायकोर्टाने 12 जणांना हत्या आणि बलात्कार प्रकरणी दोषी ठरविले होते. 
- त्यानंतर ट्रायल कोर्टाने सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाला दोषींनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते.
- या प्रकरणातील जसवंत नाई, गोविंद नाई आणि शैलेश भट्ट या तिघांना फाशीच्या शिक्षेची मागणी करणारी याचिका सीबीआयने हायकोर्टात दाखल केली होती. या तिघांना बिलकिस यांची आई आणि बहिणीने बलात्कारी मानले होते. 
 
पुढील स्लाइडमध्ये बिलकिस बानो प्रकरणाचा घटनाक्रम...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...