आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरला भेटण्याची बिल गेट्स यांची इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या बॉलीवूड अभिनेता आमिर खानच्या चाहत्यांमध्ये आणखी एका व्यक्तीची भर पडली आहे. गंमत म्हणजे हा चाहता भारतीय नव्हे तर विदेशी असून त्याला भेटण्यासाठीच जगभरातील अनेक लोक उत्सुक असतात. ती व्यक्ती म्हणजे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक बिल गेट्स. मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी त्यांच ब्लॉगच्या माध्यमातून आमिर खानला भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

गेट्स यांनी म्हटले आहे की, ‘मी बॉलीवूड स्टार व सक्रिय कार्यकर्ता आमिर खानला भेटू इच्छितो. मी असे ऐकले आहे की, मुलांच्या पालन पोषणासाठी त्याने युनिसेफचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून काम केले आहे. तसेच मी टीव्हीवरील त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या शोबद्दलही ऐकले आहे. यातून त्याने ग्रामीण भागातील समस्या ठळकपणे मांडल्या होत्या.’ गेट्स यांनी पुढे म्हटले आहे की, जर आमिरने मला नृत्याच्या काही स्टेप्स शिकवल्या तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन. आमिरने ‘सत्यमेव’ जयते’मधून टीव्हीवर पदार्पण केले होते. त्यात त्यांनी कन्या भ्रूणहत्या, हुंडाबळी प्रथा, बाल शोषण यासारखे विषय ठळकपणे मांडले होते.