आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bill Gates In The World And Mukesh Ambani In India Number One Billionaire

बिल गेट्स जगातील तर मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बिल गेट्स पहिल्या स्थानावर कायम आहेत. त्यांच्याकडे 68 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. तर भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांचे स्थान कायम आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख असलेल्या मुकेश अंबानींकडे 18 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. भारतात सध्या 70 अब्जाधीश आहेत.
मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले असले तरी, जागतिक श्रीमंतांच्या यादीतते 41 व्या स्थानावर आहेत. चीनमधील ‘हुरुन’ या कंपनीने एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, भारताने श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या देशाच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. अंबानी जागतिक यादीत 41 व्या स्थानावर आहेत. अंबानींपाठोपाठ 17 अब्ज डॉलरचे मालक असलेले डॉ. लक्ष्मी मित्तल हे जगातील 49 वे अब्जाधीश आहेत. 13.5 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले सन फार्मास्यूटिक उद्योगाचे दिलीप संघवी आणि विप्रोचे अझिम प्रेमजी हे दोघेही 77 व्या स्थानावर आहेत. याशिवाय टाटा सन्सचे पल्लोंजी मिस्त्री तसेच एसपी हिंदुजा आणि परिवार यांची संपत्ती 12 अब्ज डॉलर असून यादीत त्यांचे स्थान 93 वे आहे.