आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यधीश पवारांकडे एकही गाडी नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. या वेळी त्यांनी आपली स्थावर, जंगम तसेच इतर अशी 32 कोटी 90 लाखांची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे एकही गाडी नाही.
पवारांची 2004 मध्ये 3 कोटी, 27 लाखांची मालमत्ता होती. 2007 मध्ये ती वाढून 8 कोटी, 72 लाख झाली आणि आता ती थेट 32 कोटींवर गेली आहे. गेल्या सहा वर्षांत त्यांच्या मालमत्तेत 24 कोटींची भर पडल्याचे प्रतिज्ञापत्र सांगते. याशिवाय एकत्रित कुटुंबाची शेतजमीन तसेच घरांचाही समावेश आहे. पवारांच्या मालमत्तेत एकही गाडी नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून ते ज्या गाड्यांमधून प्रवास करतात त्या कोणाच्या नावावर आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.