आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bills Are Pending Of Maharashtra Ministers Offices Renunciation

कंत्राटदार हवालदिल : मंत्र्यांच्या ‘उधळपट्टी’ची देयकेच राेखून धरली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप- शिवसेना युतीचेे सरकार सत्तेवर येताच अनेक हाैशी मंत्र्यांनी आपली दालने नव्याने सजवण्यास घेतली. यासाठी लाखो रुपयांचा खर्चही करण्यात आला.
विस्तारित इमारतीत दालन मिळालेल्या मंत्र्यांनी दालनांच्या सुशोभीकरणावर खर्च केला खरा; परंतु आता सामान्य प्रशासन विभागाने या खर्चाची आवश्यकता होती का? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना केला अाहे. तसेच त्यांचा खुलासा न आल्याने दालनांसाठी कंत्राटदारांनी केलेली दोन कोटींची बिले अडकवून ठेवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘दिव्य मराठी’नेच सर्वप्रथम मंत्र्यांच्या या उधळपट्टीची बातमी दिली होती. मुख्यमंत्र्यांनीही या बातमीची दखल घेतली होती.

युती सरकारमधील जवळजवळ १५ मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आपल्या दालनांच्या सुशोभीकरणावर खर्च केला आहे. यामध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही मंत्र्यांना नंतर नव्या मुख्य इमारतीत कार्यालय देण्यात आले. मागील सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांचे कार्यालय एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. अनिल देशमुख यांनी दालन नव्याने तयार करून घेतले होते, तरीही एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दालनाचे नूतनीकरण केले. प्रकाश मेहता यांनी नूतनीकरणानंतर फक्त वॉलपेपर बदलल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले होते. रवींद्र वायकर, गिरीश बापट, चंद्रकांत पाटील, विष्णू सावरा, विद्या ठाकूर, संजय राठोड आदी मंत्र्यांनी दालने नव्याने तयार करून घेतली. मात्र, ही कामे करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सामान्य प्रशासन विभागाची परवानगीही घेतली नसल्याचे उघड झाले आहे. कंत्राटदारांची बिले मंजुरीसाठी आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने कार्यालये नव्याने तयार करण्याची आवश्यकता होती का, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडे मागितला आहे. खुलासा न आल्याने एक कोटी ९९ लाख ९० हजार ८३९ रुपयांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे कंत्राटदार प्रचंड नाराज झाले आहेत.
सर्वाधिक ३० लाखांवर खर्च वायकर, पाटलांचा
चंद्रकांत पाटील ३१,८८,०६७
रवींद्र वायकर ३३,९९,१७०
विष्णू सावरा २०,४८,२७१
विनोद तावडे २०,२४,७५५
रणजित पाटील १५,५३,४५०
प्रकाश मेहता १४,२७,९०६
गिरीश महाजन १३,४३,१२७
एकनाथ शिंदे ९,९२,७१४
विद्या ठाकूर ९,९८,३१४
संजय राठोड ९,९६,३९६
राजकुमार बडोले ४,८३,८६४
गिरीश बापट ४,४६,७९८
दिलीप कांबळे ४,६७,९२०
दीपक केसरकर ४,००,३३६
चंद्रशेखर बावनकुळे २,१९,७५०