आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार सानू, अलका याज्ञिक लादेनचे मोस्ट फेव्हरेट, या गोष्टीही होत्या आवडत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी ओसामा बिन लादेन. - Divya Marathi
दहशतवादी ओसामा बिन लादेन.
मुंबई- अल-कायदाचा प्रमुख दहशतवादी ओसामा बिन लादेन हा भारतीय गायक कुमार सानू, उदित नारायण, अल्का याज्ञिक याचा फॅन असल्याचे समोर आले आहे. कुमार सानू हा ओसामाला प्रचंड आवडायचा. 
 
उडत्या चालींची गाणी गाणारा उदित नारायण आणि अलका याज्ञिक हे मोस्ट फेव्हरेट असल्याचे सांगण्यात येते. 2011 साली अबोटाबादमधल्या ओसामाच्या घरात केलेल्या ऑपरेशन जेरोनिमोमध्ये सील कमांडोजनी त्याचा खात्मा केला. त्यावेळी त्याच्या घरातला संगणकही जप्त करण्यात आला. त्यातील तब्बल 4 लाख 70 हजार फाईल्स सीआयएने रिट्राईव्ह केल्या आहेत.
आत्मघातकी स्फोटांची प्रात्यक्षिकं, सामूहिक हत्या, नाईन-ईलेव्हनच्या कटाच्या अनेक फाईल्स, आयसिससोबतचे मतभेद, काश्मीरसंदर्भातली माहिती अशा अनेक फाईल्स या संगणकात होत्या.
 
त्यातल्या काही फाईल्स सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. तर बाकीची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. त्यातच ही माहिती आहे. फिफा वर्ल्डकपमधले उत्कृष्ट गोल लादेनने सेव्ह करुन ठेवले होते.
 
ब्राझिलचा गारिन्चा, कॅमरूनचा रॉजर मिला, स्पेनचा फर्नांडो टोरेस हे त्याचे आवडते खेळाडू होते. त्यांनी केलेले भन्नाट गोल्स ओसामाने आपल्या संगणकात सेव्ह करुन ठेवले होते.
ओसामाची नजर भारतावरही होती. कारण त्याच्या संगणकात दिल्लीतल्या 2010 च्या हॉकी वर्ल्डकपच्या सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांच्या फाईल्सही होत्या. शिवाय स्टोरी ऑफ इंडियाची अख्खी सीरिज त्याच्याकडे होती. पण त्याचा खात्मा करण्यात आला.
 
पुढील स्लाईडवर पाहा लादेनच्या आवडत्या गायकांचे, खेळाडूंचे फोटो आणि अन्य माहिती
बातम्या आणखी आहेत...