आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधे माँच्‍या कुटुंबीयांनी दिली डॉली बिंद्राला जिवे मारण्‍याची धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधे मॉंसोबत डॉली बिंद्रा. - Divya Marathi
राधे मॉंसोबत डॉली बिंद्रा.

मुंबई - सिने कलाकार डॉली बिंद्रा यांना वारंवार जिवे मारण्‍याच्‍या धमकीचे फोन कॉल येत आहेत. याबाबत त्‍यांनी मलाड पोलिस ठाण्‍यात तक्रार दिली. दरम्‍यान, आपल्‍याला राधे माँच्‍या कुटुंबाकडून धोका असून, त्‍यांनीच हा कॉल केल्‍याचा संशय बिंद्रा यांनी व्‍यक्‍त केला आहे. विशेष म्‍हणजे डॉली या राधे माँच्‍या भक्‍त होत्‍या. काही दिवसांपासून त्‍यांना अनोळखी क्रमांकावरून धमकीचे कॉल आणि मॅसेस येत आहेत. यामुळे राधे माँ या पुन्‍हा वादात सापडल्‍या आहेत. काही दिवसांपूर्वी त्‍यांचा मिनी स्‍कर्ट घातलेला फोटो सोशल मीडियावर व्‍हायलर झाला होता. नंतर एका चित्रपट निर्मात्‍याने त्‍यांच्‍यासोबत अफेअर असल्‍याचा दावा केला होता. आता डॉली यांच्‍या तक्रारीनंतर त्‍या पुन्‍हा चर्चेत आल्‍या आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, डॉली यांचे राधे माँसोबतचे फोटोज आणि तक्रारीची प्रत.