आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birth Death Certificat Now Online Rajesh Agrawal

जन्म-मृत्यूचा दाखलाही मिळणार ऑनलाइन - राजेश अग्रवाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सातबारा उता-याप्रमाणे आता जन्म-मृत्यूचा दाखलाही ऑनलाइन देण्याचा निर्णय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने घेतल्याची माहिती विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.

राज्य सरकारच्या या निर्णयाने आता जन्म, मृत्यू दाखला, सातबाराचा उतारा घरबसल्या मिळणार आहे. सर्व सरकारी दाखले ऑनलाइन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यापैकी जन्म-मृत्यूचा दाखला आणि सातबा-याच्या उता-यासह एकूण 17 कागदपत्रे लवकरच ऑनलाइन करण्यात येणार आहेत. यासंदर्भातील अधिसूचना येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे राजेश अग्रवाल यांनी सांगितले. याशिवाय कृषी, सामान्य प्रशासन, शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, अन्न व नागरी पुरवठा यासह सर्व विभागांना त्यांच्या सुविधा ऑनलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागातील सर्व सुविधा ऑनलाइन करण्याकडे सरकारचा कल असून प्रत्येक विभागाची कोणती सुविधा ऑनलाइन करणार आणि किती दिवसात ती ऑनलाइन करणार याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाला सविस्तर कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित कागदपत्रे व्यक्तीला किती दिवसांच्या मुदतीत उपलब्ध होतील, याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे.