आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस चौकीतच बलात्कार: फौजदाराने मॉडेलचा घेतला चावा, 105 पोलिस साक्षीदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एप्रिल महिन्यात एका 29 वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी तीन पोलिसांसह इतर पाच जणांना आरोप बनविण्यात आले आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने या मॉडेलवर पोलिस चौकीतच बलात्कार केल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे. संबंधित उपनिरीक्षकाने मॉडेलच्या अंगाचा दाताने चावा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक विभागाने दिलेल्या अहवालात याला दुजोरा मिळाला आहे. घटनेनंतर मॉडेलने याबाबतची तक्रार पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे केली होती. ज्यानंतर या प्रकरणी 105 पोलिस कर्मचा-यांनी साक्ष दिली आहे. याच आधारावर सर्व आरोपींवर 1168 पानाचे चार्जशीट दाखल केले आहे.
हे आहेत आरोपी पोलिस कर्मचारी-
याप्रकरण फौजदार सुनील खापते, सुरेश सूर्यवंशी आणि कॉन्स्टेबल योगेश पोंडे आरोपी आहेत. या प्रकरणात एका महिलेलाही आरोपी बनविण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण-
दोन महिन्यापूर्वी एप्रिल महिन्यात सकिना पोलिस चौकीत तीन पोलिस कर्मचा-यांनी एका मॉडेलवर बलात्कार केला होता. आरोपी सहाय्यक उपनिरीक्षकाने मानवतेला काळिमी फासत मॉडेलवर बलात्कार करतानाच तिच्या ब्रेस्टला दाताने चावले होते. संबंधित मॉडेलने याबाबतची तक्रार राकेश मारिया यांना भेटून केली होती. या घटनेतील एक आरोपी अद्याप फरार आहे.
फॉरेन्सिक रिपोर्टमधून सिद्ध झाले दाताने चावा घेतल्याचे-
पोलिसांनी चार्जशीटसोबत फॉरेन्सिक रिपोर्टची कॉपी जोडली आहे. त्यानुसार, मॉडेलच्या डाव्या ब्रेस्टला दाताने काटल्याचे म्हटले आहे. चावा घेतलेल्या ठिकाणाच्या जखमा खपातेच्या दाताशी मॅच झाल्या आहेत. या प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-याने सांगितले की, पीडित मॉडेलचा जबाब आणि कोरोबोरेटिव सायटिंफिक एविडेंसने हे स्पष्ट झाले आहे. खापतेने या मॉडेलवर पोलिस चौकीतच बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॉडेलने काय दिला आहे जबाब-
पीडीत मॉडेलने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, दोन एप्रिल रोजी पोलिसांनी मला ताब्यात घेतले तसेच सकिना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथून मला पुन्हा संघर्ष नगर पोलिस चौकीत नेण्यात आले जेथे माझ्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर मला दुस-या दिवशी दुपारी सोडण्यात आले. पीडीत मॉडेलने या पोलिसांवर हा ही आरोप केला की, मला आणि माझ्या मित्राला 10 लाख रूपयांची मागणी केली.
पोलिस आयुक्तांना दिले होते फोटो-
आरोपी पोलिसांच्या लैंगिक जाचापासून मुक्त होताच मॉडेलने चावा घेतलेल्या ब्रेस्टचा व तेथील जखमाचे फोटो काढले होते. तसेच पोलिस आयुक्त राकेश मारियाकडे फोटोसह तक्रार दाखल केली होती. यानंतर क्राईम ब्रॅचने फोटो आणि मोबाईल (ज्या मोबाईलमधून फोटो काढले होते) फॉरेन्सिक चौकशीसाठी पाठवले होते. ज्यात खापते याच्या दाताचे (डेंटल) प्रोफाईल मॅच झाले आहेत.
साक्षीदार पलटणार नाहीत याचा पोलिस दलाला विश्वास-
या केसचे तपास अधिकारी यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी 105 पोलिस कर्मचा-यांना साक्षीदार बनविण्यात आले आहे. याचबरोबर 21 अन्य लोकांनी साक्ष दिली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या घटनेत बहुतेक साक्षीदार पोलिस कर्मचारी आहेत. त्यामुळे कोर्टात साक्ष बदलण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा होईल असे आपण स्पष्टपणे म्हणू शकतो.
बातम्या आणखी आहेत...