आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:\'STING\'मुळे भाजपात भूकंप: मोदी-शहा, फडणवीसांवर पुरोहितांची तोफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- स्टिंगमध्ये बोलताना राज पुरोहित. दिव्यमराठी.कॉमने या स्टिंगची सत्यता पडताळली नाहीये)
मुंबई- केंद्र व राज्य सरकारमधील नेत्यांची वेगवेगळी प्रकरणे बाहेर येत असल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष व आमदार राज पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वासह धोरणावर टीका करतानाच राज्यातील काही नेत्यांवर आगपागड केली असल्याचे एक स्टिंग बाहेर आले आहे.
राज पुरोहित यांचे स्टिंग ऑपरेशन केलेली सीडी आज काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले असून त्यात पुरोहित मोदी सरकारची धोरणे, त्यांनी घेतलेले निर्णय, तसेच मुख्यमंत्री, मंगलप्रभात लोढा यांच्यासह बिल्डर्सच्या संबंधांवरही टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, या घटनेने भाजपात राजकीय भूकंप झाला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या सीडीच्या सत्यतेची पडताळणी केल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ असे म्हटले आहे. या स्टिंग ऑपरेशननंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही बोलती बंद झाली आहे.
उत्तर भारतीय व हिंदी पट्ट्यातील राज पुरोहित हे मुंबईतून 5 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पुरोहित पहिल्यापासूनच महाजन-मुंडे गटाचे म्हणून ओळखले जातात. दरम्यान, या स्टिंगनंतर पुरोहित यांच्यावर भाजपकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका केल्याने मनसे कार्यकर्त्यांनी राज पुरोहित यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचे वृत्त आहे.
राज पुरोहित यांनी काय-काय म्हटले आहे या तथाकथित स्टिंग ऑपरेशनमध्ये...
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा आहे, मात्र त्यांच्या काही धोरणांमुळे व्यापारी वर्ग दुखावला गेला आहे.
- भाजपात आता सामूहिक नेतृत्व उरलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा ही देशातील दोन सत्ता केंद्रे बनली आहेत. असल्या लोकशाहीला काहीच अर्थ नाही.
- आजकाल पक्षात पैसा असणा-यांचीच चलती आहे. संघ पण त्याच दिशेने चालला आहे. पैसा ओतला असता तर मलाही मंत्रिपद मिळालं असते पण तसे होऊ शकले नाही.
- माझ्यावर अन्याय झाला आहे. मला मंत्रिमंडळात घेतले असते तर मी खडसेनंतर सर्वात वरिष्ठ मंत्री ठरलो असतो.
- गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सर्व राजकारण बदललं आहे. मुंडे आज असते मी किंगमेकर असतो.
- मुंडे असते तर देवेंद्र फडणवीस कुठे व कोण असते?, मुख्यमंत्र्यांवर बिल्डर लॉबी नाराज आहे.
- भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी प्रमोद महाजन यांचा सर्व पैसा लाटला त्यातून ते गब्बर झाले आहेत. तोच पैसा त्यांनी बिल्डर्स लॉबीत गुंतवला आहे.
- गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत मंगलप्रभात लोढा यांनी पैसा ओतला आहे.
- राज ठाकरे बोगस नेता आहे. तो मेहनती व कर्तृत्ववान अजिबात नाही. तो एक दिवस गल्लीतील नेता होईल. जातीयवादी व समाजात दुही पसरवण्याचे काम राज यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...