आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ANALYSIS: हा निव्वळ योगायोग की BJP-NCP ची छुपी युती, जाणून घ्या...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- सोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेला एक फोटो.)
प्रथम भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेसोबत गेल्या 25 वर्षांपासून असलेली युती तोडण्याची घोषणा केली. याच वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. ती काही मिनिटांसाठी पुढे ढकलण्यात आली. परंतु, अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गेल्या 15 वर्षांपासून कॉंग्रेससोबत असलेली आघाडी तोडण्याची घोषणा केली.

दोन्ही पक्षांनी क्रमाक्रमाने मैत्री तोडली. पण हा निव्वळ योगायोग होता, की नवीन सत्ता समिकरणांची नांदी याची चर्चा रंगलेली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी मैत्री असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटना घडामोडींमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका बघण्यासारखी राहणार आहे. महायुतीतील काही घटकपक्ष शिवसेनेसोबत जाणार असून काहींनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे येत्या काही दिवसांतील राजकारण आणि कुरघोड्या बघण्यासारख्या राहणार आहेत.

यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुका अतिशय रंजक राहतील, असे सांगितले जात आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जर निवडणुकीपूर्वी एकत्र आले नाही तर राज्यात आपल्याला चौरंगी लढत दिसून येईल. त्याचा फायदा लहान पक्ष आणि अपक्षांनाही होताना दिसून येईल.
पुढील स्लाईडवर वाचा, नवीन सत्ता समिकरणांमध्ये कुणाचे पारडे राहिल जड... कोण पडेल मागे... कशी राहतील सत्ता समिकरणे...