आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा रावण दहनाचा कार्यक्रम सेनेने उधळला; BJP MP किरीट साेमय्यांविराेधी राग व्यक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिका माफियामुक्त करण्याची घोषणा करून ‘भ्रष्टाचाररूपी रावणा’चे दहन करण्याचा भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा प्रयत्न शिवसैनिकांनी मंगळवारी उधळून लावला. मुंबईतील मुलूंड परिसरात दसऱ्याचे औचित्य साधून खासदार सोमय्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचाररुपी रावणाच्या दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. भाजप शिवसेना कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीमुळे युतीच्या संबंधात नव्याने तणाव निर्माण हाेण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेना- भाजपच्या मुंबईतील नेत्यांमध्ये जाेरदार वाक्युद्ध सुरु असते. युतीची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष, अामदार आशिष शेलार, खासदार किरीट सोमय्या यांनी विरोधकांच्या सुरात सूर मिसळत सातत्याने शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. काही दिवसांपूर्वी साेमय्यांनी ‘मुंबई मनपाची निवडणूक स्वबळावर लढवणार ही मनपा माफियामुक्त करणार’ अशी घाेषणा केली हाेती. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मंगळवारी साेमय्यांनी मुलूंड येथे महापालिकेतील भ्रष्टाचाररुपी रावणाच्या प्रतिमेचे दहन करणार असल्याचे साेमवारी जाहीर केले हाेते. महापालिकेतील भ्रष्टाचाराला फक्त िवसेनाच जबाबदार असल्याचा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्याचा सोमय्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी या कार्यक्रमात घुसून रावणाच्या पुतळ्याची मोडतोड करत भाजप कार्यकर्त्यांनाही धक्काबुक्की केली. शिवसैनिकांनी महिलांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप सोमय्यांनी केला. हल्लेखोरांनी खुर्च्यांची फेकाफेक केल्याने अनेक कार्यकर्ते जखमी झाले. शिवसेनेच्या या गुंडगिरीला घाबरत नसल्याचे साेमय्या म्हणाले. महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढेल असे वक्तव्य गेल्याच आठवड्यात किरीट सोमय्यांनी केले होते. भाजपमधला एक मोठा वर्ग सध्या शिवसेनेबरोबर युती करू नये या मताचा असून या घटनेमुळे दोन्ही पक्षांतील संबंध अजून ताणले जातील.
बातम्या आणखी आहेत...