आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक पात्रता: लोणीकरप्रकरणी भाजप बॅकफूटवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल चुकीची माहिती दिली असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली अाहे. त्यावरून भाजपला बॅकफूटवर जावे लागले. दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंह तोमर यांच्या बनावट पदवीवरून खळबळ उडाली असताना लोणीकर अद्याप मंत्रिमंडळात कसे, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर पत्रकारांनी लोणीकरांच्याबद्दल प्रश्नांचा भडीमार केला. त्यावेळी दानवेंनी आपल्याला या वादाबद्दल काही खास माहिती सुरूवातीला सांगितले. मात्र तरीही प्रश्न थांबत नसल्याचे पाहून ‘लोणीकर यांची कागदपत्रे मागविली आहेत. अभ्यास करून पक्ष अापली भूमिका ठरवेल,' असे सांगत दानवे यांनी पत्रकार परिषदच गुंडाळली.