आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Can Easily Win The Confidence Motion Tomorrow

शक्तिपरीक्षेत सरकार सहज पास होणार, डावी आघाडी उजव्या गटात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजप आणि शिवसेनेत युती होण्याची कोणतेच चिन्हे दिसत नसली तरीही विश्वासदर्शक ठरावाच्या शक्तिपरीक्षेत फडणवीस सरकार सहज उत्तीर्ण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने पहिली लढाई भाजपने जिंकल्यात जमा आहे.

भाजपला किमान १३५ आमदारांचे पाठबळ लाभेल, असे संकेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मतदानाच्या वेळेस गैरहजर राहणार असल्याचे जवळपास स्पष्ट असल्याने विधानसभेची सदस्यसंख्या २४६ होत असून त्यापैकी सरकारच्या बाजूने िनम्म्यापेक्षा एक अधिक म्हणजेच १२४ मते आवश्यक आहेत. भाजपचे रासपच्या एका आमदारासह १२२ आमदार आहेत. डाव्या आघाडीतील ५ सदस्यही मतदानाच्या वेळेस गैरहजर राहून सरकारला अप्रत्यक्षपणे मदत करू शकतात. अशा वेळेस सभागृहाची सदस्य संख्या २४१ च होते. त्यामुळे केवळ १२१ आमदारांच्या बळावरच हे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकते. सरकारला ७ अपक्ष आणि हितेंद्र ठाकूर यांच्या ३ आमदारांचे समर्थन मिळू शकते. त्यामुळे सरकारचा विजय निश्चित आहे.

डाव्यांचा उजवा मधूचंद्र
सेना-भाजप युतीवर कायम जातीयवादाचे आरोप करणारी शेकापप्रणित डावी-पुरोगामी आघाडी बुधवारी पहिल्यांदाच उजव्या गटात सामील झाल्याचे पहायला मिळण्याची शक्यता आहे.अध्यक्षाच्या िनवडीवेळी डाव्या आघाडीचे पाचही सदस्य सरकारसोबत असतील. िवश्वासदर्शक ठरावावेळी मात्र ते एकतर तटस्थ राहतील किंवा गैरहजर राहण्याची शक्यता अधिक आहे. शेकापचे भाई जयंत पाटील, भारिपचे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि माकपचे डाॅ. अशोक ढवळे या आघाडीचे नेते होत. डाव्या-पुरोगामी िवचारांशी तडजोड केल्याचा आरोप होण्याच्या भितीपोटी त्यांनी सरकारला मतदान न करताही मदत करण्याचा िनर्णय घेतला आहे.

भाजपचा शिवसेनेला पुन्हा ठेंगा
सत्तेतील वाटा आणि विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा असा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे दोन नेते मंगळवारी भाजप नेत्यांना भेटायला गेले खरे परंतु त्यांनी त्यांना आमच्या हाती काही नाही, असे सांगून दिल्लीकडे बोट दाखवले. त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही.

छोट्यांना मोठे महत्त्व
शेकाप, भाकप, भारिप यांनी यावेळीही महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली एकत्र िनवडणुका लढवल्या होत्या. त्यामुळे ही आघाडी एकत्रितच िनर्णय घेणार आहे. शेकाप ३, भारिप १ आणि माकप १ असे या आघाडीचे ५ सदस्य आहेत. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येईल अशी संख्या असलेल्या या आघाडीला कधी नव्हे इतके महत्त्व आले आहे.